S M L

जळगावात पाणीटंचाई, पाणीपट्टीत मात्र वाढ

21 एप्रिलजळगाव महापालिकेने 1 एप्रिलपासून पाणीपट्टीत दुप्पट वाढ केली आहे. आणि ही वाढ करताना रोज पाणीपुरवठा करू हे आश्वासन नागरिकांना दिले. पण प्रशासनाच्याच कर्मचार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने हा दावा फोल ठरला आहे.शहराच्या 35 टक्के भागांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कबूल केल्यानुसार रोज पाणी देत नसाल तर ही वाढीव पाणीपट्टी कमी करा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या कार्यतत्पर कर्मचार्‍यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. तर पाणी समस्येबाबत नागरिकांची एकही तक्रार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. पण पालिकेच्याच सर्वेक्षण रिपोर्टमध्ये 35 टक्के जळगावकरांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.जळगावला जामनेरमधील वाघूर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 03:07 PM IST

जळगावात पाणीटंचाई, पाणीपट्टीत मात्र वाढ

21 एप्रिल

जळगाव महापालिकेने 1 एप्रिलपासून पाणीपट्टीत दुप्पट वाढ केली आहे. आणि ही वाढ करताना रोज पाणीपुरवठा करू हे आश्वासन नागरिकांना दिले. पण प्रशासनाच्याच कर्मचार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने हा दावा फोल ठरला आहे.

शहराच्या 35 टक्के भागांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कबूल केल्यानुसार रोज पाणी देत नसाल तर ही वाढीव पाणीपट्टी कमी करा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

तर दुसरीकडे पालिकेच्या कार्यतत्पर कर्मचार्‍यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.

तर पाणी समस्येबाबत नागरिकांची एकही तक्रार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. पण पालिकेच्याच सर्वेक्षण रिपोर्टमध्ये 35 टक्के जळगावकरांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

जळगावला जामनेरमधील वाघूर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close