S M L

'जय' गेला, 'जय'वाघाची शिकार झाल्याचं उघड !

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2016 04:34 PM IST

'जय' गेला, 'जय'वाघाची शिकार झाल्याचं उघड !

 04 ऑक्टोबर : उमरेड कारंडलामधून बेपत्ता झालेल्या 'जय' वाघाची शिकार झाल्याचं समोर आलंय. जय वाघावर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनी या वाघाची शिकार झाल्याची माहिती दिलीय.

काही दिवसांपूर्वी उमरेड कारंडला अभयारण्यामध्ये एका वाघाचे केस सापडले होते. डीएनए चाचणीमध्ये हे केस जय वाघाचेच असल्याचं निष्पन्न झालंय. जय वाघ 16 जुलैपर्यंत जिवंत होता, असंही या रिपोर्टमध्ये आढळलंय. डेहरादूनच्या वाईल्डलाइफ इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे डॉ. बिलाल हबीब हे उमरेड कारंडलामध्ये वाघांवर संशोधन करत होते. त्यांंनी जय वाघाला दोनदा रेडिओ कॉलर लावली होती. पण या रेडिओ कॉलरने सिग्नल देणं बंद केल्यानंतर जय वाघाचा शोध सुरू झाला होता. आशियातला हा सर्वात मोठा वाघ कुठे गायब झाला याबद्दल सगळ्यांनाच चिंता लागून राहिली होती. आता मात्र जयच्या शिकारीची बातमी आल्यानंतर हा सगळ्यांसाठीच धक्का मानला जातोय. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या वाघांमध्ये जयची गणना होत असे. जयचे फोटो काढण्यासाठी जगभरातून छायाचित्रकार उमरेड कारंडला अभयारण्यात येत होते.

150 किमीचा पल्ला गाठणारा 'जय' !

- आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ 'जय' 250 किलो वजनाचा

- 2013 मध्ये जय नागझिरामधून 150 किमी टप्पा पार करत उमरेड कारंडलामध्ये आला

- 'अल्फा' वाघानंतर जय 'उमरेड कारंडला' मध्ये स्थिरावला.

- तीन वाघिणांना 'जय' पासून 15 हुन जास्त बछडे झाले.

- 18 एप्रिलला जयच्या रेडिओ कॉलरचे सिग्नल मिळणं बंद झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close