S M L

ऐश्‍वर्या सलमानसोबत करणार सिनेमा, पण...

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2016 07:43 PM IST

ऐश्‍वर्या सलमानसोबत करणार सिनेमा, पण...

04 ऑक्टोबर : ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान आता कुठल्याही सिनेमात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण नुकतीच एका मासिकाला मुलाखत देताना ऐश्वर्या राय म्हणाली की सलमान खानसोबत काम करायला माझी काही हरकत नाही असं स्पष्ट केलंय.

ऐश्वर्या-सलमानची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये बरीच वर्ष चघळली गेली. दोघंही कधी कुठल्या समारंभाला समोरासमोर आले तर एकमेकांची नजर चुकवायचे. पण आता चित्र बदलतंय. ऐश्वर्याला सलमानसोबत काम करायला काहीच अडचण नाही पण तिची एक अट आहे. ती म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक आणि पटकथा चांगली असायला हवी...यावर सलमानचं काय म्हणणं आहे ते अजून कळलं नाहीय.

'हम दिल चुके सनम' सिनेमापासून ऐश्वर्या आणि सलमान यांचं प्रेम बहरलं. आणि मग 'दबंग' खानची दबंगगिरी चांगलीच जाणवायला लागली. आधी प्रेमाच्या कथा आणि नंतर त्यांच्यामधल्या तणावाची चर्चाही रंगू लागली. एकदा ऐश्वर्या रायच्या घराबाहेर सलमाननं गोंधळ घातला आणि मग सगळंच तुटलं. दोघांचे मार्ग पूर्ण वेगळे झाले. ऐश्वर्या बच्चन खानदानाची सून झाली. आणि सलमान अनेक गर्लफ्रेंडसमध्ये आपलं प्रेम शोधत राहिला. दोघं एकमेकांबद्दल अवाक्षरही काढत नव्हते. पण आता लवकरच चित्र बदलेल. जुन्या जखमा भरल्या आणि ऐश्वर्या राय बच्चन आता प्रोफेशनल वागायला तयार झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close