S M L

जायकवाडीत फक्त 5 टक्के पाणीसाठा

21 एप्रिलऔरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणामध्ये सध्या फक्त 5 टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने, औरंगाबादकर त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याची ही स्थिती समोर असताना महापालिकेने मात्र कोणतीही आपत्कालीन यंत्रणा अद्यापही उभी केली नाही. सध्या शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जलाशयाची पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी झाले आहे. धरणातील गवत पंपिंगजवळ येत असल्याने ते काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी तीन पाणबुडेही मुंबईहून मागवण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराला दररोज 180 दशलक्ष लीटर पाणी लागते. त्यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणातून 100 दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा होतो. 99 वॉर्ड असणार्‍या शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी 56 पाण्याच्या टाक्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 03:12 PM IST

जायकवाडीत फक्त 5 टक्के पाणीसाठा

21 एप्रिल

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणामध्ये सध्या फक्त 5 टक्के पाणीसाठा आहे.

धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने, औरंगाबादकर त्रस्त झाले आहेत.

पाणीपुरवठ्याची ही स्थिती समोर असताना महापालिकेने मात्र कोणतीही आपत्कालीन यंत्रणा अद्यापही उभी केली नाही.

सध्या शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जलाशयाची पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी झाले आहे.

धरणातील गवत पंपिंगजवळ येत असल्याने ते काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी तीन पाणबुडेही मुंबईहून मागवण्यात आले आहेत.

औरंगाबाद शहराला दररोज 180 दशलक्ष लीटर पाणी लागते. त्यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणातून 100 दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा होतो.

99 वॉर्ड असणार्‍या शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी 56 पाण्याच्या टाक्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close