S M L

औंरगाबादमध्ये शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज, लाठीचार्जदरम्यान पोलिसाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2016 08:32 PM IST

औंरगाबादमध्ये शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज, लाठीचार्जदरम्यान पोलिसाचा मृत्यू

औरंगाबाद, 04 ऑक्टोबर : विना अनुदानित शिक्षकांचा मोर्चा अनियंंत्रित झाला आणि दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्च केला. मात्र लाठीचार्ज दरम्यान पोलीस कर्मचा•ऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

आज औरंगाबादेत 8 वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर विना अनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढला. मात्र या मोर्च्याला हिंसक वळण लागले. जमाव शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी चार अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.अर्ध्या तासाच्या झटापटीनंतर जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलं. मात्र या लाठीचार्जमध्ये पंधरा शिक्षक जखमी झाली तर पाच जण गंभीर जखमी झालेत. लाठीचार्ज दरम्यानच एका पोलिसाला हार्ट ऍटकचा झटका आला. त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात हलवण्यात आलं मात्र दुदैर्वानं त्यांचा मृत्यू झाला. हा पोलीस औरंगाबाद रेल्वे पोलीसचा जवान असून त्याचं नाव राहुल कांबळे असं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनुदानाची मागणी कऱणारा शिक्षक आज संतप्त झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 08:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close