S M L

अँजलिनामुळे ब्रॅडची अवस्था कठीण

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2016 10:48 PM IST

अँजलिनामुळे ब्रॅडची अवस्था कठीण

04 ऑक्टोबर : हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटची मानसिक स्थिती फारशी बरी नाही.अभिनेत्री अँजलिना जोलीनं घटस्फोटाचा अर्ज दाखल केला काय, ब्रॅडची अवस्था फारच वाईट झालीय.

लग्नाला दोन वर्ष झाली असली तरी दोघांचं सहजीवन आहे 12 वर्षांचं. सध्या ब्रॅड पिटला मुलांचाच मानसिक आधार आहे. सध्या त्याचे आईवडील, जवळचे मित्रमैत्रिणी, मॅनेजर सतत त्याच्याशी संवाद साधत असतात. अँजलिना आणि ब्रॅडमध्ये एक करार झालाय. त्यानुसार ब्रॅड आपल्या सहा मुलांना भेटू शकतो. मुलं अँजलिनाजवळ राहतील यावर ब्रॅड सहमत आहे. ब्रॅड जेव्हा मुलांना भेटेल तेव्हा त्याच्यासोबत एक थेरिपिस्टही असेल. या दोघांचे दुरावलेले संबंध मुलांमुळे का होईना सुधारतील अशी आशा ब्रॅडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close