S M L

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार 13 तारखेला सादर करणार प्रतिज्ञापत्र

Samruddha Bhambure | Updated On: Oct 5, 2016 01:46 PM IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार 13 तारखेला सादर करणार प्रतिज्ञापत्र

05 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक काहीवेळापूर्वीच संपली. या बैठकीनंतर राज्य सरकारने येत्या 13 तारखेला हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकार मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक आणि गंभीर आहे.

आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेना आमदार एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीकडे राजकीय वर्तुळासह अनेकांचे लक्ष लागले होते. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाकडून राज्यभरात विविध ठिकाणी मूक क्रांती मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सरकारवरील दबाव वाढला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2016 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close