S M L

मनोहरांचा मोदींवर पलटवार

22 एप्रिलबीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आयपीएलचे कमिशनर ललित मोदींवर पलटवार केला आहे. मोदींनी ट्विटरवर गोपनीय माहिती उघड करायला नको होती, असे म्हणत शशांक मनोहर यांनी मोदींना टार्गेट केले आहे. तसेच मोदींनी कितीही विरोध केला तरी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक 26 तारखेला होणारच, असे मनोहर यांनी स्पष्ट केले आहे. फ्रॅन्चाइझींची चौकशी कालचा दिवस गाजला तो आयकर विभागाने आयपीएल संबंधित एजन्सीजवर घातलेल्या धाडींमुळे. आणि आता आयकर विभागाने आयपीएलच्या फ्रॅन्चाइझीचीही माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. आयपीलच्या मागील 6 महिन्याचे फोन रेकॉर्डही आयकर विभाग तपासत आहे.मात्र या दरम्यानच कोलकाता नाईट रायडर्स आणि क्रिकेट क्लब ऑफ बंगाल यांच्यामधील सामंजस्य कराराची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समजते. रॉयल चॅलेजर्स बंगलोरच्या टीमने त्यांची सगळी कागदपत्रे सादर केली आहेत. मोदींची चौकशीएन्फोर्समेंट डिरेक्टर आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी वरळी इथं ललित मोदींची चौकशी केली. सकाळी साडेआठ पासून ही चौकशी सुरू होती. वरळीतील फोर सिझन या हॉटेलमध्ये त्यांची चौकशी झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 08:37 AM IST

मनोहरांचा मोदींवर पलटवार

22 एप्रिल

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आयपीएलचे कमिशनर ललित मोदींवर पलटवार केला आहे.

मोदींनी ट्विटरवर गोपनीय माहिती उघड करायला नको होती, असे म्हणत शशांक मनोहर यांनी मोदींना टार्गेट केले आहे.

तसेच मोदींनी कितीही विरोध केला तरी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक 26 तारखेला होणारच, असे मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.

फ्रॅन्चाइझींची चौकशी

कालचा दिवस गाजला तो आयकर विभागाने आयपीएल संबंधित एजन्सीजवर घातलेल्या धाडींमुळे.

आणि आता आयकर विभागाने आयपीएलच्या फ्रॅन्चाइझीचीही माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.

आयपीलच्या मागील 6 महिन्याचे फोन रेकॉर्डही आयकर विभाग तपासत आहे.

मात्र या दरम्यानच कोलकाता नाईट रायडर्स आणि क्रिकेट क्लब ऑफ बंगाल यांच्यामधील सामंजस्य कराराची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समजते.

रॉयल चॅलेजर्स बंगलोरच्या टीमने त्यांची सगळी कागदपत्रे सादर केली आहेत.

मोदींची चौकशी

एन्फोर्समेंट डिरेक्टर आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी वरळी इथं ललित मोदींची चौकशी केली.

सकाळी साडेआठ पासून ही चौकशी सुरू होती. वरळीतील फोर सिझन या हॉटेलमध्ये त्यांची चौकशी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close