S M L

किरीट सोमय्यांची घोषणा पक्षाची अधिकृत भूमिका नाही -भाजप

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2016 04:25 PM IST

किरीट सोमय्यांची घोषणा पक्षाची अधिकृत भूमिका नाही -भाजप

 05 ऑक्टोबर : राज्यात सत्ता मिळवल्यानंतर भाजपला आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. कालपर्यंत दबक्या आवाजात स्वबळाचा नारा देणा•ऱ्या भाजप कार्यकर्त्यांची भूमिका किरीट सोमय्या यांनी बोलावून दाखवली. पण, ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं भाजपने जाहीर केलंय.

भाजप आणि युतीमध्ये सध्या शांतता पसरलीये. मध्यंतरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीमध्ये मतभेद टोकाला पोहोचले होते. भाजप आणि सेनेच्या नेत्यांनी युती तोडाच असे इशारेही दिले होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येते या वादावर पडदा टाकला होता.

आता पुन्हा एकदा भाजपमधून स्वबळाचा नारा दिला गेलाय. भाजप मुंबई महापालिकेची 227 जागांची निवडणूक स्वबळावर लढणार आहे असा खुलासा सोमय्यांनी केली. तसंच मुंबईत ठाकरे कुटुंबाने मुंबई महापालिकेला अड्डा बनवलाय तो आम्ही समाप्त करू अशा इशाराही सोमय्यांनी दिला. मात्र, सोमय्यांनी खुलासा केल्यानंतर काही तासांतच

मुंबई महानगर पालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची किरीट सोमय्यांची ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं भाजप सूत्रांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक वेळा असे इशारे भाजपने दिले. त्यामुळे हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न आहे का ? हेही लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close