S M L

पुन्हा 'आदर्श' तपास करा, हायकोर्टाने सीबीआयला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2016 04:42 PM IST

पुन्हा 'आदर्श' तपास करा, हायकोर्टाने सीबीआयला फटकारलं

05 ऑक्टोबर : आदर्श बेनामी फ्लॅट्स प्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. सीबीआयला हा मोठा धक्का मानला जात आहे. आम्हाला तपासासाठी सहा महिने लागतील असं सीबीआयनं कोर्टाला सांगितलं पण कोर्टानं तुम्ही तपास करा आणि दोन महिन्यात सीबीआयनं किती तपास केला आहे याचा अहवाल सादर करावा असा आदेशही कोर्टाने दिला आहे.

यापूर्वी सीबीआयने या प्रकरणी दोन सीलबंद अहवाल कोर्टाला सादर केले होते. त्यावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान सीबीआयला पुढील चौकशी करायची आहे की नाही हे कोर्टात हजर असलेल्या सीबीआयच्या पश्चिम विभागाच्या सहसंचालकांनी हो किंवा नाही अशा स्वरूपात स्पष्टपणे सांगावे अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने फटकारलं. सीबीआयने या प्रकरणी आपला तपास संपला असल्याचे कोर्टाला दिलेल्या दोन सीलबंद अहवालात म्हटले होतं. तर चौकशी संपली आहे पण कोर्टाने आदेश दिल्यास सीबीआय पुन्हा चौकशी करेल असं सीबीआयच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. न्यायमुर्ती अभय ओक आणि अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या अहवालातील काही मुद्यांचा उल्लेख करत आपण याबद्दल असमाधानी आहोत असे ताशेरे ओढले. याचिकाकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी या प्रकरणाची सीबीआय योग्य रीतीने तपास करत नसून सीबीआय महत्वाची माहिती दडवत आहे असा आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close