S M L

विरोधकांसाठी कुठलं अस्त्र कधी वापरायचं हे मी ठरवणार -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2016 09:04 PM IST

विरोधकांसाठी कुठलं अस्त्र कधी वापरायचं हे मी ठरवणार -मुख्यमंत्री

05 ऑक्टोबर : विरोधकांसाठी माझ्याजवळ खूप अस्त्रं आहेत. कोणतं अस्त्रं कधी वापरायचं हे मी ठरवणार आहे असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

आज मुंबईत भाजपच्या कार्यकरणीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. विरोधकांचं नाक दाबण्यासाठी अनेक कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांसाठी माझ्याजवळ खूप अस्त्र आहेत कुठलं अस्त्र कुठे आणि कधी वापरायचं हे मी ठरवणार असा धमकीच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसंच

तुम्ही विरोधकांची काळजी करू नका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला न डगमगता सामोरे जा, आक्रमक राहा आपण केलेलं काम जनतेसमोर मांडा असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

तसंच मराठा मोर्चाला घाबरू नका, हा मोर्चा आपल्या विरोधी नाही. हा मराठा समाजाचा 40 वर्षांचा आक्रोश आहे. तो आक्रोश प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकांना आपण काय केलं ते सांगा अन्यथा असा आक्रोश आपल्याविरोधात पुढे येईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अलिकडच्या काळात भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा इशारा म्हणजे सहकारी मंत्र्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 07:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close