S M L

221 तालुके टंचाईग्रस्त

22 एप्रिल राज्यातील खरीप हंगामात गेल्या वर्षीपेक्षा घट झाल्याने 221 तालुके टंचाईग्रस्त जाहीर झाले आहेत. कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली. जयंत पाटील यांनी याबद्दलचा प्रश्न विचारला होता. पूर्व विदर्भातील जवळपास 7 लाख 31 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील शेतकर्‍यांना केंद्र सरकारने 148 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. जवळपास 44 लाख 29 हजार हेक्टर पिकांचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या भागाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय आकस्मिकता निधी वापरला जाणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 10:06 AM IST

221 तालुके टंचाईग्रस्त

22 एप्रिल

राज्यातील खरीप हंगामात गेल्या वर्षीपेक्षा घट झाल्याने 221 तालुके टंचाईग्रस्त जाहीर झाले आहेत. कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली.

जयंत पाटील यांनी याबद्दलचा प्रश्न विचारला होता. पूर्व विदर्भातील जवळपास 7 लाख 31 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील शेतकर्‍यांना केंद्र सरकारने 148 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

जवळपास 44 लाख 29 हजार हेक्टर पिकांचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या भागाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय आकस्मिकता निधी वापरला जाणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close