S M L

तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही -सुप्रिया सुळे

Sachin Salve | Updated On: Oct 6, 2016 04:18 PM IST

sule_on_cm_fadanvis06 ऑक्टोबर : मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुदैर्व आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही असं प्रतिआव्हान आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी दिलंय. नंदुरबारमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. कुंडल्यांचा वापर शस्त्र म्हणून करण्याची भाषा शोभत नसल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

विरोधकांचं नाक दाबण्यासाठी अनेक कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांसाठी कुठले अस्त्र कधी वापरायचे ही मी ठरवणार अशी धमकीवजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या इशा•याचा समाचार घेत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जशाच तसे उत्तर दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुदैर्व आहे. तुम्ही आम्हाला कितीही धमक्या द्या आम्ही घाबरणार नाही असं प्रतिउत्तर सुळेंनी दिलं. तसंच शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 गुन्हा दाखल करण्याची गरज आहे अशी मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडलीये. मुख्यमंत्री चिडका बिब्याचा डबा आहे, नळावरच्या बायकांसारखे ते भांडतात अशी टीका सुळे यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2016 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close