S M L

राजन राजे नाराज

22 एप्रिलमनसेच्या पहिल्या फळीतील आणखी एका नेत्याने राजीनामा देण्याची तयारी चालवली आहे. ठाणे शहरातील लोकसभा आणि विधानसभेत मनसेचे उमेदवार असलेल्या राजन राजे यांनी आपली पक्षात गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांत राजे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राजे यांनी ठाण्यात काही बॅनर्स लावले आहेत. पण त्यावरचा मजकूर इंग्रजीत आहे. त्यामुळे पक्षाच्या धोरणाविरुद्ध हे बॅनर्स असल्याचे विचारताच आपण पक्षावर नाराज आहोत, अशी थेट कबुलीच त्यांनी दिली आहे. तसेच आपण आपली भूमिका एक मे नंतर जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 10:44 AM IST

राजन राजे नाराज

22 एप्रिल

मनसेच्या पहिल्या फळीतील आणखी एका नेत्याने राजीनामा देण्याची तयारी चालवली आहे.

ठाणे शहरातील लोकसभा आणि विधानसभेत मनसेचे उमेदवार असलेल्या राजन राजे यांनी आपली पक्षात गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे.

गेल्या काही दिवसांत राजे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राजे यांनी ठाण्यात काही बॅनर्स लावले आहेत. पण त्यावरचा मजकूर इंग्रजीत आहे. त्यामुळे पक्षाच्या धोरणाविरुद्ध हे बॅनर्स असल्याचे विचारताच आपण पक्षावर नाराज आहोत, अशी थेट कबुलीच त्यांनी दिली आहे.

तसेच आपण आपली भूमिका एक मे नंतर जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close