S M L

'वेलकम बॅक गांधी'मध्ये अनुपम खेर राजकीय तज्ज्ञाच्या भूमिकेत

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2016 03:23 PM IST

'वेलकम बॅक गांधी'मध्ये अनुपम खेर राजकीय तज्ज्ञाच्या भूमिकेत

06 ऑक्टोबर : अभिनेता अनुपम खेर वेलकम बॅक गांधी सिनेमात राजकीय तज्ज्ञाची भूमिका साकारतायत. रमना कम्युनिकेशनची निर्मिती असलेला हा सिनेमा गांधीजींचा अहिंसावाद आणि आदर्शवाद प्रेक्षकांपर्यंत पोचवणार आहे. अभिनेता एस. कनागराज सिनेमात महात्मा गांधींची भूमिका करतायत. राजकीय तज्ज्ञ बनलेल्या अनुपम खेरना देशात प्रामाणिक शासन आणायचंय.

एल. बालकृष्णन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलंय. गांधीजींनी आता भारतदौरा केला तर काय होईल, ही सिनेमाची संकल्पना आहे. यावर दिग्दर्शक ए. बालकृष्णन म्हणाले, सध्याचा काळ वाईट आहे. सगळीकडे अशांतता आहे. अशावेळी गांधीजी काय भूमिका घेतील, हा सिनेमाचा विषय आहे. वेलकम बॅक गांधी 30 जानेवारी 2017ला रिलीज होणार आहे. 30 जानेवारीला गांधी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी हा सिनेमा रिलीज होईल. ऍटनबरोंच्या 'गांधी' सिनेमाची जादू अजूनही लोकांच्या मनावर आहे. त्यानंतर मुन्नाभाईला भेटलेले गांधीजी म्हणजे दिलीप प्रभावळकर तर कायमच लक्षात राहिले. आता वेलकम बॅक गांधीमधले गांधी कसे आहेत, याबद्दल उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2016 10:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close