S M L

कोपर्डी प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2016 06:35 PM IST

कोपर्डी प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल

rape_case_mumbaiअहमदनगर, 07 ऑक्टोबर : अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी अखेर 87 दिवसांनंतर आज आरोपपत्र दाखल केलंय. आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमेवर खून आणि कलम 302 आणि 376 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगर सत्र-न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय.

13 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातीत कर्जत तालुक्यात कोपर्डी इथं राहणा•या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमेवर यांना अवघ्या 48 तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र,आरोपी पकडल्यानंतर तब्बल 81 दिवसानंतरही अरोपपत्र दाखल झालं नाही. 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं आवश्यक होतं. नाहीतर आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता आहे. आज अहमदनगर सत्र-न्यायालयात पोलिसांनी 87 व्या दिवशी आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि खुनाचा आरोप केलाय. ण कलम 302 आणि 376 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी भेटीनंतर तीस दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र 86 दिवसांनंतरही आरोपपत्र दाखल करण्यास अपयश आलंय. त्यामुळे आरोपपत्रावरुन राजकीय पक्षही आक्रमक झाले होते. त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे मोर्च निघत आहे. अखेर आता हे आरोपपत्र दाखल झाले असून आरोपींना कोणती शिक्षा सुनावली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आरोपपत्रात काय काय मुद्द्यांचा समावेश ?

अहमदनगर सत्र न्यायालयात 3 आरोपींविरोधात आरोपपत्र

जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ नितीन भैलुमेवर आरोपपत्र दाखल

अटकेच्या 87 व्या दिवशी आरोपींविरोधात आरोपपत्र

आरोपपत्रात 70 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत

साडेतीनशे पानांचे आरोपपत्र अहमदनगर सत्र न्यायालयात दाखल

 आरोपींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2016 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close