S M L

मुस्लीम समाजाचाही आरक्षणासाठी मोर्चा

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2016 08:02 PM IST

मुस्लीम समाजाचाही आरक्षणासाठी मोर्चा

07 ऑक्टोबर : मालेगावमध्ये आज मुस्लीम समाजाने आरक्षणासाठी मूक मोर्चा काढला होता. बडा कब्रस्तानपासून निघालेल्या या मोर्चात लाखो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. या मोर्चात नाशिक, धुळे, भिवंडी इथून लोकं सहभागी झाले होते.

'एकच मिशन, मुस्लीम आरक्षण' असे फलक घेऊन हा मोर्चा निघाला. मुस्लीम समाजाने आरक्षणासाठी काढलेला हा पहिलाच मोर्चा आहे.

बीडजवळ अंबाजोगाईमध्येही मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा निघाला होता. मुस्लीम बांधवांनी अंबाजोगाईच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. अनेक सरकारी समित्यांनी मुस्लीम बांधवांसाठी सुचवलेलं आरक्षण त्वरित द्या, अशी या मोर्चेक•यांची मागणी आहे.

राज्यभरात मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघतायत. मराठ्यांच्या मोर्चानंतर ओबीसींनीही छगन भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये मोर्चा काढला होता. आता मुस्लीम समाजानेही आरक्षणासाठी मोर्चे काढायला सुरुवात केलीय.

मुस्लिमांना मिळणार का आरक्षण ?

शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्यात 52 % आरक्षण

सरकारने मुस्लीम बांधवांसाठी 5 % आरक्षणाची वाढीव तरतूद केली होती.

पण मुंबई हायकोर्टाने हे आरक्षण फेटाळलं.

धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2016 08:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close