S M L

बिग बॉसच्या घरात येणार मांत्रिक !

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2016 11:08 PM IST

बिग बॉसच्या घरात येणार मांत्रिक !

o7 ऑक्टोबर :येत्या 16 ऑक्टोबरपासून कलर्सवर बिग बॉसचा दहावा सीझिन सुरू होतोय आणि यावेळी त्यात सर्वसामान्य माणसं असणार आहेत. दरवर्षी बिग बॉसमध्ये काही ना काही नवीन असतं.. यावेळी असं म्हणतात, शोमध्ये मांत्रिक आणि पहेलवान यांची एंट्री असणारेय.

याशिवाय बिग बॉस सदस्यांमध्ये कुणी शिक्षक, कुणी डॉक्टर तर कुणी गृहिणीही असेल. पण मांत्रिकाच्या एंट्रीनं अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. सलमान खाननं प्रोमोमध्ये असंही म्हटलंय की, 'तांत्रिक ने दिया ऑडिशन,भूतो और प्रेतो से है उसका कनेक्शन' त्यामुळे या नव्या सिझनमध्ये काय काय पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रचंड वाढलीय. सेलिब्रिटीशिवायचा हा बिग बॉस 10 जास्त चर्चेत येईल असं वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2016 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close