S M L

मनसेच्या दोन नगरसेवकांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2016 01:02 PM IST

 मनसेच्या दोन नगरसेवकांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

09 ऑक्टोबर : मुंबईतल्या खड्‌ड्यांवरुन महापालिकेला लक्ष्य करणारे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. काल संध्या. 7.30 वाजता हे दोघे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी स्वत:ला अटक करवून घेण्याची मागणी केली. त्यांना वरळीच्या रात्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईतील खड्ड्े बुजवण्यात आले असा दावा मुंबई महापालिकेनं केला होता. मात्र, शहरात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे जशेच्या तसे आहे. खड्डे बुजवा नाहीतर कानाखाली देऊ अशी धमकीच संदीप देशपांडे यांनी दिली होती. एवढंच नाहीतर पालिकेच्या अधिकाऱ्यांला पकडून खड्यांना मीच जबाबदार असे फलकही संदीप देशपांडेंनी हाती सोपवले होते. मनसेच्या या आंदोलनाविरोधात 4200 पालिका अधिकाऱ्यांनी संदीप देशपांडेंना अटक करा या मागणीसाठी राजीनामास्त्र उपसले.एवढंच नाहीतर त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. अखेर स्वत: संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावून अटक करून घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2016 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close