S M L

उरी हल्ल्यातल्या शहिदांना बिग बींची सुरांची मानवंदना

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2016 02:14 PM IST

उरी हल्ल्यातल्या शहिदांना बिग बींची सुरांची मानवंदना

09 ऑक्टोबर : बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे लवकरच उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी सुरांची मानवंदना देणार आहेत. शहीद सैनिकांसाठी तयार होणाऱ्या गाण्याला ते स्वतःचा आवाज देणार आहेत. हे गाणं आपल्यासाठी जीव धोक्यात टाकणाऱ्या जवानांना समर्पित असेल.

या गाण्याचं रेकॉर्डिंग लवकरच होणार आहे. आणि गाणं देखील लवकरच रिलीज केलं जाईल असं सध्या बोललं जातंय. याआधीही टी 20 विश्व चषक क्रिकेट सामन्याच्या वेळी भारत-पाकिस्तान सामन्याआधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं राष्ट्रीय गीत ऐकायला मिळालं होतं. देशासाठी काही काम असेल तर अमिताभ बच्चन नेहमीच अग्रेसर असतात. पोलिओ कँपेनसाठीही बिग बींनी आवाहन केलं. तेव्हा ही चळवळ जास्त प्रभावी झाली होती. भाजपचे सदस्य तरुण विजय हे सुपरस्टारला भेटले आणि शहिदांना आदरांजली देण्यासाठी गाणं गाण्याची विनंती केली. लवकरच बिग बींचे सूर आपल्याला ऐकायला मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2016 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close