S M L

सहाव्या मजल्यावरुन पडून चिमुरड्याचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2016 06:50 PM IST

सहाव्या मजल्यावरुन पडून चिमुरड्याचा मृत्यू

बदलापूर, 09 ऑक्टोबर : खेळता खेळता इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून 4 वर्षांच्या मुलाचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडलीये. शिवांस यादव असं या चिमुरड्याचं नाव आहे. शिवांस खेळता खेळता किचनमधील बाल्कनीत गेला. तिथून त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यात चिमुरड्या शिवांसचा जागीच मृत्यू झालाय.

बदलापूरमधील कात्रपच्या सत्यम प्राईम इमारतीत यादव कुटुंब वास्तव्य करतं. त्यांचा मुलगा शिवांस दुपारी घरात हॉलमध्ये आपल्या वडिलांना सोबत बसला होताय अचानक वडिलांची नजर चुकवून तो खेळता खेळता घरच्यां स्वयंपाक घरात गेला आणि स्वयंपाक घराच्या गॅलरीत अर्धवट असलेल्या रेलिंगवरून खाली डोकावून बघतांना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यादव याच्या घरातील स्वयंपाक घराच्या गॅलरील पूर्ण सुरक्षा ग्रील बसवलेल्या नाहीत. त्यामुळे ही दुदैर्वी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2016 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close