S M L

नवी मुंबईच्या मूळ रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ !

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2016 07:19 PM IST

नवी मुंबईच्या मूळ रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ !

नवी मुंबई, 09 ऑक्टोबर : नवी मुंबईच्या मूळ रहिवाशांनाच आता बेघर होण्याची पाळी आली आहे. नवी मुंबईच्या औद्योगिक पट्‌ट्यातल्या आदिवासी पाड्यातल्या आदिवासींनी घर भाडेपट्टी न भरल्याने महापालिका त्यांची मालमत्ता जप्त करणार आहे. ग्रामपंचायतीच्या काळात 3 रूपये असलेली घरपट्टी आता 500 रूपयांपर्यंत गेलीये. एकतर पोटाला अन्न नाही आणि त्यात 50-60 हजारांवर असलेली ही घरपट्टी कशी भरणार असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडलाय.

नवी मुंबई शहर.. शहराच्या एका बाजूस खाडी किनारा तर दुस•या बाजूस पर्वत रांगा...यामध्ये वसलेल्या या शहराची झपाट्यानं वाढ झाली. माञ, शहराच्या या झगमगाटात मुळ आदिवासी माञ हरवून गेलेत. पुर्वी नाचणी, भात, तूर, उडीद हे उत्पन्न घेणा•या या आदिवासींना आता डोंगरांमधिल लाकूड कापण्याशिवाय शिवाय उत्पन्नाचं साधन नाहीये. आणि ज्या औद्योगिक पट्यात हे पाडे आहेत.

त्या औद्योगिक क्षेञातील कारखान्यांमध्ये नवी मुंबईतील हे मुळ आदिवासी आज देशोधडीला लागलेत. ग्रामपंचायत काळात फक्त 3 रूपये असलेली घरपट्टी आता महापालिकेनं 500 रूपयांपर्यंत आणली आहे. एकतर पोटाला अन्न नाही अशात ही 50 ते 60 हजाराची घरपट्टीची थकीत न भरल्यानं महापालिका आता यांच्या घरातील मालमत्ता जप्त करणार आहे. आदिवासींची भावी पिढी उज्ज्वल होण्यासाठी महापालिकेकडून 31 मुलांना आंगणवाडीचं शिक्षण दिलं जातंय. माञ महापालिका फक्त 8वी पर्यंतच शिक्षण देते. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यानं दरवर्षी 17 ते 18 मुलं शिक्षण सोडून घरात बसताहेत. हे चिञ पाहिल्या नंतर खरंच या आदिवासी समाजाचा विकास होतोय का हाच खरा प्रश्न निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2016 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close