S M L

कोर्टाच्या आवारात पोलिसांना मारहाण

22 एप्रिलपुण्यात चिंचवडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कोर्टाच्या आवारात पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली. चिंचवडमध्ये काल एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. बाबा वाघमोडे नावाच्या ड्रायव्हरने एका महिलेवर बलात्कार केला होता.त्याला आज पोलिसांनी लपवून कोर्टाच्या आवारातून बाहेर काढले. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले. आणि त्यांनी कोर्टाच्या आवारातच पोलिसांना मारहाण केली. तसेच दगडफेकही केली. त्यात चार पोलीस जखमी झाले. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. या प्रकरणात मनसेच्या काही कार्यकर्त्यांंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 03:22 PM IST

कोर्टाच्या आवारात पोलिसांना मारहाण

22 एप्रिल

पुण्यात चिंचवडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कोर्टाच्या आवारात पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली.

चिंचवडमध्ये काल एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. बाबा वाघमोडे नावाच्या ड्रायव्हरने एका महिलेवर बलात्कार केला होता.

त्याला आज पोलिसांनी लपवून कोर्टाच्या आवारातून बाहेर काढले. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले. आणि त्यांनी कोर्टाच्या आवारातच पोलिसांना मारहाण केली. तसेच दगडफेकही केली.

त्यात चार पोलीस जखमी झाले. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. या प्रकरणात मनसेच्या काही कार्यकर्त्यांंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close