S M L

पाक कलाकार नकोच !; चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2016 10:30 PM IST

पाक कलाकार नकोच !; चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

10 ऑक्टोबर : पाकिस्तानी कलावंतांना घेऊन चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत मनसे चित्रपट सेनेने पुन्हा एकदा विरोध दर्शवलाय. दिग्दर्शक महेश भट आणि करण जोहर यांना पाकिस्तानी कलाकारांनी घेऊन चित्रपट प्रदर्शित करणार असाल तर ते आम्ही होवू देणार असा इशारा मनसेनं दिलाय.

उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात लाट उसळल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना कडाडून विरोध केला. 48 तासांत भारत सोडण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या इशाऱ्यानंतर ऐ दिल हे मुश्लिक चित्रपटातील अभिनेता फवाद खानने भारतातून आपला गाशा गुंडाळला आणि पाक गाठले. आता पुन्हा एकदा मनसेनं आता पाक कलाकार असलेल्या चित्रपटांविरोधात आंदोलन पुकारले आहे. पाक कलाकारांना घेऊन चित्रपट केले तर थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय. मनसेच्या या आंदोलनामुळे आधीच झी मीडियाने पाक कलाकारांना बंदी घातली आहे. आता मनसेनं दिग्दर्शकांना टार्गेट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2016 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close