S M L

तुम्ही नागिण तर मी गारुडी, विजय शिवतारेंची मुक्ताफळं

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2016 09:51 PM IST

तुम्ही नागिण तर मी गारुडी, विजय शिवतारेंची मुक्ताफळं

10 आक्टोबर : तुम्ही नागीण आहेत तर मी बारामतीचा गारूडी आहे. फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी  आदेश द्यावा  मग बघा पुंगी वाजवितो अशी मुक्ताफळं उधळलीये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी.आष्टी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांची भाषा खूपच घसरलीय. आणि त्यामुळे दसरा आहे की शिमगा ? असा प्रश्न निर्माण झालाय. याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  टीका करताना  मी दसनंबरी नागीण आहे, असं म्हटलं होतं. त्याला आता शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरेंनीही उत्तर दिलंय. सुप्रिया दसनंबरी नागीण असतील तर मी बारामतीचा गारुडी आहे, अशी मुक्ताफळं विजय शिवतारेंनी उधळलीयत.

तसंच तुम्ही नागीण आहेत तर मी गारुडी आहे. फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी आदेश द्यावा  मग बघा पुंगी वाजवितो  आणि या नागीणच काय करतो अशी धमकीच शिवतारे यांनी दिली.  विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश बापट, राम शिंदे हे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2016 09:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close