S M L

भाजपही अडकणार

23 एप्रिलआयपीएलच्या घोटाळ्यात आता भाजपसुद्धा अडकण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीरपणे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.गेहलोत यांचे म्हणणे आहे की, आयपीएल कमिशनर ललित मोदींनी वसुंधरा राजेंच्या मदतीने राजस्थानमध्ये मोठा भूखंड घोटाळा केला आहे. ललित मोदींनी खरेदी केलेल्या हवेलीचीही चौकशी राजस्थान सरकार करत आहे. चौकशीत उघड झाले आहे, याअगोदर ललित मोदी आणि त्यांची पत्नी यांनी घेतलेल्या दोन हवेल्या या सरकारी मालमत्ता होत्या. त्यामुळे त्यांची खाजगी पद्धतीने विक्री होऊ शकत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2010 10:00 AM IST

भाजपही अडकणार

23 एप्रिल

आयपीएलच्या घोटाळ्यात आता भाजपसुद्धा अडकण्याची शक्यता आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीरपणे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

गेहलोत यांचे म्हणणे आहे की, आयपीएल कमिशनर ललित मोदींनी वसुंधरा राजेंच्या मदतीने राजस्थानमध्ये मोठा भूखंड घोटाळा केला आहे.

ललित मोदींनी खरेदी केलेल्या हवेलीचीही चौकशी राजस्थान सरकार करत आहे. चौकशीत उघड झाले आहे, याअगोदर ललित मोदी आणि त्यांची पत्नी यांनी घेतलेल्या दोन हवेल्या या सरकारी मालमत्ता होत्या.

त्यामुळे त्यांची खाजगी पद्धतीने विक्री होऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2010 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close