S M L

प्रीतम मुंडेंच्या नेतृत्वात पंकजांचं शक्तिप्रदर्शन?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 11, 2016 02:19 PM IST

प्रीतम मुंडेंच्या नेतृत्वात पंकजांचं शक्तिप्रदर्शन?

11 ऑक्टोबर : दसर्‍यानिमित्तानं आज (मंगळवारी) भगवानगडावर पंकजा मुंडे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या भगवानगडावरच्या या सभेवरून वाद रंगला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्त्वात गोपीनाथगड ते भगवानगड अशी रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत हजार गाड्या सहभागी आहेत. या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं समजलं जात आहे.

यावेळी बोलताना, पंकजाताईंनी संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे वाद महंत आणि पंकजा यांच्या कोणताही वाद नाही. दसरा परंपरा भगवानबाबांनी सुरू केली होती आणि गोपिनाथ मुंडेंनी ती पुढे सुरू ठेवली. त्याला तडा जाऊ द्यायचा नाही, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.  तसंच, पंकजाताईंना कधी काय बोलायचं हे माहितीये. भगवानगड काही राजकीय व्यासपीठ नाही, याचं भान त्यांना आहे. मुंडेसाहेब जसे संघर्षातून बाहेर पडून नायक झाले तशाच पंकजा मुंडे संघर्षातून तावूनसुलाखून निघतील असंही विश्वासही प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2016 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close