S M L

पंकजांनी गडावर यावं, माहेरचे दोन घास खावेत - नामदेवशास्त्री

Samruddha Bhambure | Updated On: Oct 11, 2016 03:07 PM IST

alsday

11 ऑक्टोबर :  भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्याला आमंत्रित केलं आहे. पंकजा यांनी भगवान गडावर येऊन दर्शन घ्यावं आणि माहेरचे दोन घास खावेत. त्यांच्या स्वागताला मी तयार आहे, असं आवाहन नामदेवशास्त्री यांनी केलं आहे.

भगवान गड हा राजकीय नसून धार्मिक आहे. त्यामुळं मूळ मालकाला विसरून चालणार नाही. हा गड वारकरी संप्रदायाचा आहे. तिथे सर्व परंपरेनुसारच पार पडेल, असंही ते म्हणाले. पंकजांबाबत माझ्या मनात कोणतीही कटूता नाही; तसंच वैमनस्यही नाही. तशी भावना आजही नाही आणि भविष्यातही नसेल. आम्ही अजातशत्रू आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

भगवानगडाला गालबोट लागेल, असं कुणी वागू नये. भाविक आणि समर्थक असं वागणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2016 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close