S M L

मुलुंडमध्ये भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2016 07:25 PM IST

मुलुंडमध्ये भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

मुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबईतल्या मुलुंडमध्ये भाजपनं आयोजित केलेल्या भ्रष्टाचाराच्या रावण दहनाच्या कार्यक्रमात राडा झालाय. या कार्यक्रमात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. शिवसैनिकांनी कार्यक्रमात हल्लाबोल करीत रावणचा पुतळा तोडला.

महापालिकेत होणारा  भ्रष्टाचार भाजप नेते यांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरला आहे.आज दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये पालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन कार्यक्रम ठेवला होता. साडे सहा वाजता हा रावण दहन करत असताना काही शिवसैनिक लाठ्या काठ्या घेऊन आले आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला.

यात भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले. पोलीस बंदोबस्त कमी होता. त्यामुळे 10 ते 15 मिनिट भाजप आणि सेना कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यानंतर पोलिसांची जास्त कुमक मागवण्यात आली. तिथे असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी काही शिवसैनिकांना पकडले. जोपर्यंत हल्ला करणारे शिवसैनिक अटक केले जाणार नाही तो पर्यंत मी मैदानातून जाणार नाही तसंच अश्या भ्याड हल्ल्याला आपण घाबरणार नाही. या पुढेही आपण पालिकेतील भ्रष्टराचार आणि माफिया राज उघड करत राहणार असं सोमय्या म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2016 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close