S M L

अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द होणार नाही - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Oct 12, 2016 11:16 AM IST

CM Deven

12 ऑक्टोबर :  राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करता येत नाही आणि यासंदर्भात सरकारचा तसा कुठलाही मानस नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

विजयादशमीच्या पर्वावर लाखो अनुयायांच्या साक्षीने नागपुरात ६०वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या चर्चेला उत्तर दिले.

अॅट्रॉसिटी कायद्यामुळे दलितांना सन्मानाने जगता आले. या कायद्यामुळे त्यांच्या हक्कांचं संरक्षण झालं. तो रद्द करण्याचा केंद्र किंवा राज्य सरकारचा असा कोणताच विचार नाही.  मात्र या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचेही बोललं जातं आहे. पण बाबासाहेबांचे अनुयायी याचा दुरुपयोग करू शकत नाहीत आणि तसं करणारे बाबासाहेबांचे अनुयायी नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मराठ्यांचे मोर्चे दलितांच्या विरोधात नाहीत. त्यामुळे कोणीही अस्वस्थ होण्याचे कारण नाही. प्रत्येक मागासांना आरक्षण देण्याची तरतूद घटनेत असून, ते बहाल करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून दिली असल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2016 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close