S M L

हवाईक्षेत्रातल्या आर्थिक मंदीचा नकारात्मक परिणाम ग्रामीण महाराष्ट्रावर

17 ऑक्टोबर, नागपूरजेट एअरवेजच्या कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र सध्या हवाई वाहतूक क्षेत्रात आलेल्या आर्थिक मंदीचा नकारात्मक परिणाम नागपूरमध्येही दिसतोय. इथे कार्गो हब होणार म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांनीही एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये अ‍ॅडमिशन्स घेतल्या आहेत.शिक्षणासाठी कर्ज काढलं. पण आता त्यांच्यापुढे नोकरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूरमध्ये कार्गो हब सुरू होण्याचा प्रकल्प सुरू आहे. परिणामी नोकरीच्या संधी निर्माण झाल्यामुळे मागच्या दोन वर्षांत सुमारे 15 एव्हिएशन इन्स्टिस्ट्यूट उघडल्या. पण आता या इन्सिस्ट्यूटमधल्या विद्यार्थ्यांना नोकर्‍या कशा मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातल्या तरुणांनी कर्ज काढून या शिक्षणावर पैसा खर्च केला आहे. शिक्षणासाठीच्या खर्चाची भरपाई कशी करायची आणि नंतर नोकरी कशी मिळवायची या चिंतेत ते आहेत. थोडक्यात काय तर,जेट एअरवेजच्या कर्मचारी कपातीचा परिणाम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 06:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 06:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close