S M L

माफियांची दलाली करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार,सोमय्यांचा सेनेवर हल्लाबोल

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2016 06:00 PM IST

माफियांची दलाली करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार,सोमय्यांचा सेनेवर हल्लाबोल

मुंबई, 12 ऑक्टोबर : मी 5 हजार कोटींचे मुंबई महानगरपालिकेतले घाटोळे बाहेर काढले, त्यामुळे मला गप्प करण्याचा तो प्रयत्न होता. पण मी गप्प बसणार नाही. मी भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार. माफियांची दलाली करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असा इशारा किरीट सोमय्यांनी सेनेला दिला.

मंगळवारी मुंबईतल्या मुलुंडमध्ये भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराच्या रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात शिवसैनिकांनी घुसून रावणाच्या पुतळ्याची मोडतोड केली. या प्रकरणावरुन सोमय्यांनी सेनेवर निशाणा साधलाय. गेल्या वर्षभरात डझनभर घोटाळे बाहेर काढले. अनेक अभियंते जेलमध्ये गेले. त्यामुळे या माफियांना मिळत असलेली दलाली बंद झाली. आता हे माफिया किरीट सोमय्या मुक्त मुंबई करण्याची भाषा करत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली. तसंच आम्ही पालिकेच्या सत्तेत वाटेकरु असलो तरी खड्डे घोटाळ्यावर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. उलट माझाच आवाज दाबला जात आहे. आमच्यासोबत येणारा मित्रपक्ष असो, खासदार असो कुणीही असो आता अनंत गिते चांगलं काम करताय त्यांचं कौतुक होणारच पण माफियांची दलाली करणाऱ्यांना जेलमध्येच टाकणार असा निर्धार सोमय्यांनी बोलून दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2016 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close