S M L

महादेव जानकरांविरोधात रान पेटले, ठिकठिकाणी पुतळे जाळले

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2016 06:11 PM IST

महादेव जानकरांविरोधात रान पेटले, ठिकठिकाणी पुतळे जाळले

 jankar_ncp3

12 ऑक्टोबर : राज्यमंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडावर केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. महादेव जानकर यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. पुणे, शिरुर, ठाणे, लातूर आणि परभणीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली जानकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला. साता•यातल्या पोवई नाक्यावर जानकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. मराठवाड्यात परभणी आणि लातूरमध्येही जानकरांचा पुतळा जाळण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2016 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close