S M L

ही विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांची जानकरांवर टीका

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2016 07:19 PM IST

ही विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांची जानकरांवर टीका

सोलापूर, 12 आॅक्टोबर : मी भाषण करताना तारतम्य ठेवून भाषण करतो. मात्र माझाबाबत या मंत्रिमंडळातले मंत्री अतिशय घाणेरडी भाषा वापरतात. त्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धी असंच याबद्दल म्हणावं लागेल अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महादेव जानकरांवर केलीय. ते  सोलापुरात बोलत होते.

राज्यमंत्री महादेव जानकर यांनी बारामतीचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही अशी असंवेदनशील भाषा आपल्या भाषणात वापरली होती. त्यावर अजित पवार यांनी आज टीका केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपली संस्कृती पाहायला हवी. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. ती लढाई वैचारिक पध्दतीने लढायला हवी. मात्र अशी भाषा गैर आहे.

घाणेरड्या भाषेत टीका करणाऱ्या मंत्र्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे अशा शब्दात अजित पवारांनी महादेव जानकरांना उत्तर दिलंय. तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही अजित पवारांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2016 07:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close