S M L

विरोधी पक्ष नेतेपदावरून सेना आक्रमक

23 एप्रिलविधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरून शिवसेना आज सभागृहात आक्रमक झाली.शिवसेनेचे सभागृहात सध्या 9 सदस्य आहेत. तर भाजपचे 8 सदस्य आहेत. शिवसेनेचे आमदार जास्त असल्याने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली होती. यासंदर्भातील पत्र विधान परिषद सभापतींना शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांना लिहीले होते. त्याला विधानभवन सचिवांनी उत्तर दिले. या उत्तरातील दोन मुद्यांना शिवसेनेचा आक्षेप होता. यात भाजपकडे विरोधीपक्षनेतेपद राहणार असे उत्तर असल्याने शिवसेनेचे सर्व आमदार आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी उरलेल्या अधिवेशनावर बहिष्कार घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2010 02:43 PM IST

विरोधी पक्ष नेतेपदावरून सेना आक्रमक

23 एप्रिल

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरून शिवसेना आज सभागृहात आक्रमक झाली.

शिवसेनेचे सभागृहात सध्या 9 सदस्य आहेत. तर भाजपचे 8 सदस्य आहेत. शिवसेनेचे आमदार जास्त असल्याने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली होती. यासंदर्भातील पत्र विधान परिषद सभापतींना शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांना लिहीले होते.

त्याला विधानभवन सचिवांनी उत्तर दिले. या उत्तरातील दोन मुद्यांना शिवसेनेचा आक्षेप होता. यात भाजपकडे विरोधीपक्षनेतेपद राहणार असे उत्तर असल्याने शिवसेनेचे सर्व आमदार आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी उरलेल्या अधिवेशनावर बहिष्कार घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2010 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close