S M L

सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची फी हडप

प्रशांत बाग, जळगाव23 एप्रिलसिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंटची फी हडप करण्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. जवळपास 41 लाखाच्या पीएएलए अकाऊंटमधील निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. याप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील दोन संशयीत मात्र फरार झाले आहेत.हॉस्पिटलच्या सीनिअर अधिकार्‍यांनीच पेशंटकडून जमा झालेली ही नाममात्र फी हडप केली आहे. सरकरानेही आता या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी, प्रशासकीय अधिकारी सी. टी. पाटील याला ताब्यात घेतले. पण निवृत्त रोखपाल ईश्वर पाटील आणि डॉ. जी. आर. भोळे हे संशयीत मात्र फरारी झाले आहेत. प्रकृतीचे कारण देत पाटील मात्र हॉस्पिटलच्याच आयसीयूत दाखल झाला आहे.सलग तीन वर्षे या निधीचा भ्रष्टाचार सुरू होता. तपासात ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी आता नाशिकच्या दोन अधिकार्‍यांचे पथक तपासासाठी दाखल झाले आहे. जिल्ह्यातील काही आमदार आणि बडे राजकीय नेते यांनाही या रकमेतील मोठे वाटप झाल्याची नोंद आहे. तशी काही कागदपत्रेही पोलिसांना मिळाली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2010 03:31 PM IST

सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची फी हडप

प्रशांत बाग, जळगाव

23 एप्रिल

सिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंटची फी हडप करण्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. जवळपास 41 लाखाच्या पीएएलए अकाऊंटमधील निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.

याप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील दोन संशयीत मात्र फरार झाले आहेत.

हॉस्पिटलच्या सीनिअर अधिकार्‍यांनीच पेशंटकडून जमा झालेली ही नाममात्र फी हडप केली आहे. सरकरानेही आता या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी, प्रशासकीय अधिकारी सी. टी. पाटील याला ताब्यात घेतले. पण निवृत्त रोखपाल ईश्वर पाटील आणि डॉ. जी. आर. भोळे हे संशयीत मात्र फरारी झाले आहेत.

प्रकृतीचे कारण देत पाटील मात्र हॉस्पिटलच्याच आयसीयूत दाखल झाला आहे.

सलग तीन वर्षे या निधीचा भ्रष्टाचार सुरू होता. तपासात ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी आता नाशिकच्या दोन अधिकार्‍यांचे पथक तपासासाठी दाखल झाले आहे.

जिल्ह्यातील काही आमदार आणि बडे राजकीय नेते यांनाही या रकमेतील मोठे वाटप झाल्याची नोंद आहे. तशी काही कागदपत्रेही पोलिसांना मिळाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2010 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close