S M L

श्याम बेनेगलांच्या सिनेमासाठी फवाद खानला ऑफर

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2016 07:33 PM IST

favad_khan13 ऑक्टोबर : पाक कलाकारांनी भारतात काम करावं की करू नये यावर बरेच वाद-प्रतिवाद होत असतानाच आणखी एक बातमी समोर येतेय. ते म्हणजे पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला ज्येष्ठ निर्माते श्याम बेनेगल यांनी एका सिनेमासाठी विचारलंय.

'ये रास्ते है प्यार के' या आगामी सिनेमासाठी श्याम बेनेगल यांनी फवादला विचारलंय. या सिनेमात एका संगीतकाराच्या भूमिकेसाठी ते फवादला सिनेमात घेण्याच्या विचारात आहेत. एकीकडे फवाद खानमुळे करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह असतानाच ही नवी बातमी समोर आलीये. त्यामुळे पुन्हा एकदा फवाद खानला कास्ट केल्यास भारतात वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता यावर फवाद खान काय भूमिका घेतोय, तो सिनेमातली ही भूमिका स्वीकारतोय की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2016 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close