S M L

मोदींसाठीची बैठक लांबणीवर

24 एप्रिलज्या बैठकीत ललित मोदी यांच्या गच्छंतीबाबतचा निर्णय होणार आहे, ती आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठकच आता चार ते पाच दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे.पण शरद पवार मोदींच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे समजते. काल पार पडलेल्या आयपीएलच्या पुरस्कार सोहळ्यात आयपीएल उभारणीसाठी मी पाच वर्षे खर्च केली. त्यामुळे मला माझी बाजू मांडण्यासाठी पाच दिवस तरी द्या, असे भावनिक आवाहन मोदी यांनी केले होते. दुसरीकडे पवारांनी ही बैठक पुढे ढकलण्याची सूचना केली असली तरी बीसीसीआय मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार 26 तारखेलाच ही बैठक होईल. मोदी नाही आले तरी ही बैठक होणारच, असे शशांक मनोहर यांनी आधीच जाहीर केले होते. माल्ल्या-पवार भेटबंगळुरु टीमचे मालक विजय माल्ल्या यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील घरी ही बैठक झाली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या वादाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. विजय माल्ल्या हे ललित मोदी यांचे समर्थक आहेत. ललित मोदी वादात सापडल्यानंतर त्यांनी उघडपणे त्यांना समर्थन दिले होते

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 06:45 AM IST

मोदींसाठीची बैठक लांबणीवर

24 एप्रिल

ज्या बैठकीत ललित मोदी यांच्या गच्छंतीबाबतचा निर्णय होणार आहे, ती आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठकच आता चार ते पाच दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे.पण शरद पवार मोदींच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे समजते.

काल पार पडलेल्या आयपीएलच्या पुरस्कार सोहळ्यात आयपीएल उभारणीसाठी मी पाच वर्षे खर्च केली. त्यामुळे मला माझी बाजू मांडण्यासाठी पाच दिवस तरी द्या, असे भावनिक आवाहन मोदी यांनी केले होते.

दुसरीकडे पवारांनी ही बैठक पुढे ढकलण्याची सूचना केली असली तरी बीसीसीआय मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार 26 तारखेलाच ही बैठक होईल. मोदी नाही आले तरी ही बैठक होणारच, असे शशांक मनोहर यांनी आधीच जाहीर केले होते.

माल्ल्या-पवार भेट

बंगळुरु टीमचे मालक विजय माल्ल्या यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील घरी ही बैठक झाली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या वादाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

विजय माल्ल्या हे ललित मोदी यांचे समर्थक आहेत. ललित मोदी वादात सापडल्यानंतर त्यांनी उघडपणे त्यांना समर्थन दिले होते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 06:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close