S M L

मोहालीमध्ये आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरी टेस्ट

17 ऑक्टोबर, मोहाली भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरी टेस्ट आजपासून मोहालीत खेळली जाणार आहे. आणि या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत. बंगलोर टेस्ट ड्रॉ झाल्याने या टेस्टमॅचचा निर्णय लागणार का याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. ही मॅच जिंकून सिरिजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करणार आहेत. गेले दोन दिवस मोहालीत पडणार्‍या पावसाने दुस-या टेस्टबद्दल अनिश्चिततेचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यातच अनिल कुंबळेच्या दुखापतीवरून सुरू असलेल्या वादामुळेही भारतीय खेळाडू त्रस्त झाले आहेत. यावरुनच कुंबळेवर सतत टीकाही होत आहे. पण कुंबळेला स्वत: ला मात्र आपल्या सहकार्‍यांच्या पाठिंब्यावर पूर्ण विश्वास आहे. या टेस्टमॅचमध्येही सगळ्यांचं लक्ष्य असेल ते भारताच्या बलाढ्य मीडल ऑर्डरवर. बंगळुरूमध्ये चांगल्या फॉर्मची चुणूक त्यांनी दाखवून दिली आहे. आता मोहालीमधल्याअनुकूल वातावरणाचा फायदा त्यांनी करून घ्यावा असंच सगळ्यांना वाटत असणार. ऑस्ट्रेलियानेही बंगळुरू टेस्टमध्ये चांगल्या कामगिरीचा दावा केला आहे. पण हेडन आणि क्लार्कचा खराब फॉर्म त्यात स्टुअर्ट क्लार्कची दुखापत आणि चांगल्या स्पिन बॉलर्सचा आभाव... या बाजू ऑस्ट्रेलियन्सना डोकेदुखी ठरू शकतात.पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानं मोहाली टेस्टमध्ये दोन्ही टीम्स आपली सर्वोकृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 06:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 06:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close