S M L

औरंगाबादमध्ये अनधिकृत घरांची संख्या वाढली

शेखलाल शेख, औरंगाबाद24 एप्रिलऔरंगाबादमध्ये अनधिकृत घरांची संख्या वाढत आहे. गुंठेवारीतील घरे नियमित न झाल्याने त्याचा फटका जवळपास तीन लाख लोकांना बसला आहे. आता या जागा नियमित करण्यासाठी महापालिकेने मिशन गुंठेवारी अभियानाला सुरुवात केली होती. पण योजनेला खिळ बसली आहे. शहरात आजही 2001 पूर्वीची 33 हजार घरे अनधिकृत आहेत. गुंठेवारीतील घरांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. नागरिकांनी वारंवार प्रयत्न करूनही ही घरे अधिकृत होत नाहीत. 2001 नंतर बांधलेली घरे नियमित करण्यासाठी गुंठेवारीचा कायदा आड येत आहे.अशी एकूण 60 हजार घरे गुंठेवारीत येतात. महापालिकेच्या आकडेवारीनुसार निवासी क्षेत्रात 118 वसाहती असून त्यात 20 हजार 582 घरे येतात. 246 अनधिकृत वसातहतींमध्ये 45 हजार 171 घरे आहेत. 2001 नंतर बांधलेल्या घरांच्या फाईल्स महापालिकेने रद्द केल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 07:56 AM IST

औरंगाबादमध्ये अनधिकृत घरांची संख्या वाढली

शेखलाल शेख, औरंगाबाद

24 एप्रिल

औरंगाबादमध्ये अनधिकृत घरांची संख्या वाढत आहे. गुंठेवारीतील घरे नियमित न झाल्याने त्याचा फटका जवळपास तीन लाख लोकांना बसला आहे.

आता या जागा नियमित करण्यासाठी महापालिकेने मिशन गुंठेवारी अभियानाला सुरुवात केली होती. पण योजनेला खिळ बसली आहे. शहरात आजही 2001 पूर्वीची 33 हजार घरे अनधिकृत आहेत.

गुंठेवारीतील घरांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. नागरिकांनी वारंवार प्रयत्न करूनही ही घरे अधिकृत होत नाहीत. 2001 नंतर बांधलेली घरे नियमित करण्यासाठी गुंठेवारीचा कायदा आड येत आहे.

अशी एकूण 60 हजार घरे गुंठेवारीत येतात. महापालिकेच्या आकडेवारीनुसार निवासी क्षेत्रात 118 वसाहती असून त्यात 20 हजार 582 घरे येतात. 246 अनधिकृत वसातहतींमध्ये 45 हजार 171 घरे आहेत.

2001 नंतर बांधलेल्या घरांच्या फाईल्स महापालिकेने रद्द केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 07:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close