S M L

दुःखाच्या प्रसंगी दुरावलेली नाती पुन्हा जवळ आली

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2016 05:34 PM IST

दुःखाच्या प्रसंगी दुरावलेली नाती पुन्हा जवळ आली

14 ऑक्टोबर : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडिल पंडितअण्णा मुंडेंवर आज परळीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हजर होते. मुंडे घराण्यातील या दुःखाच्या प्रसंगीच दुरावलेली नाती जवळ आल्याचं चित्र पहायला मिळालं.

पंकजा यांनी धनंजय यांना मिठी मारून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. भगवानगडावरील प्रवेशावरून झालेल्या वादामुळे पंकजा आणि धनंजय यांच्यातले संबंध ताणले गेले होते. पंकजांसोबतच्या अनेक साथीदारांनी धनंजय यांनाच यासाठी उघडपणे जबाबदार धरलं होतं. मात्र आजच्या या प्रसंगामुळेअखेर रक्ताची नातीच एकमेकांना सावरू शकतात हे दिसून आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2016 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close