S M L

आभाळचं फाटलंय, कुठे कुठे ठिगळं लावणार ?,हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2016 07:52 PM IST

आभाळचं फाटलंय, कुठे कुठे ठिगळं लावणार ?,हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

14 ऑक्टोबर : कुपोषणाच्या मुद्द्यांवरून आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फैलावर घेतलं. आता आभाळच फाटलंय तर कुठे कुठे ठिगळं लावणार अशा शब्दात हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारलं. तसंच एवढा निधी असून, सगळी यंत्रणा असून 30-30 वर्षं सरकार करतं काय ? जर बाबा आमटे आणि अभय बंग यावर काम करतात तर सरकार का करत नाही, ही शेवटची संधी आहे. काम करा नाहीतर 25 ऑक्टोबरला आम्ही काय तो आदेश देऊ, असे कडक ताशेरे हायकोर्टाने राज्य सरकारवर ओढले.

ठाणे, मेळघाट आणि पालघरमधील कुपोषण प्रकरणी हायकोर्टात याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतलं. 0-6 वर्ष वयोगटातील बालमृत्यूंमध्ये गेल्या काही वर्षांत घट झाल्याचा दावा सरकारने केला होता. तसंच कुपोषित बालकांना सरकार सकस आहार देत असल्याची माहितीही दिली. या प्रकारात काही त्रुटी आहेत पण त्याचं प्रमाण कमी आहे अशी सरकारनं कोर्टात सांगितलं.

नागरिक टॅक्स भरतात, त्यांचा पैसा हा लोकांकरताच वापरला गेला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये. अभय बंग आणि बाबा आमटेंसारखे व्यक्ती एकट्यानेच सामाजिक प्रश्नांवर काम करतात आणि प्रश्न सोडवतात पण सरकारकडे सगळी यंत्रणा हाताशी असूनही तीस तीस वर्ष काहीच करताना दिसत नाही. सरकार फक्त कारण देत राहतं अशा शब्दात हायकोर्टाने सरकारला फटकारलं. तसंच पालभरमध्ये गेल्या दोन महिन्यांत अनेक बालमृत्यू झाले, मंत्र्यानी भेट दिली पण पुढे काय झालं?, काही लगेच पाऊलं उचलली का जात नाही? असा खडासवालही हायकोर्टाने उपस्थिती केला.

कोर्टानं सरकारला फटकारलं

- मुंबईजवळ कुपोषणामुळे मृत्यू होत असतील तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल?

- केंद्राकडून 2 हजार कोटींचा निधी येतो, हा निधी जातो कुठे?

- पालघरमध्ये बालमृत्यू झाल्यावर मंत्र्यांचे दौरे झाले. पुढे काय केलं?

- ही सरकारला शेवटची संधी आहे. नाहीतर काय करायचं याचा आदेश 25 ऑक्टोबरला देऊ.

- हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचा•यांची नेमणूक केली का?

- ठाणे आणि मेळघाटातल्या कुपोषणाचं काय?

- अभय बंग आणि बाबा आमटे याच्यावर काम करतात. मग सगळी यंत्रणा असून सरकार काही का करत नाही?

- आदिवासी आश्रमशाळेत मुलींवर अत्याचार होतात. त्याबद्दल तुम्ही काय केलं?

- आश्रमशाळेत होणाऱ्या अत्याचारांची आकडेवारी सादर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2016 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close