S M L

रणजीत स्वप्नील-अंकित जोडीचा महापराक्रम

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2016 11:46 PM IST

रणजीत स्वप्नील-अंकित जोडीचा महापराक्रम

14 ऑक्टोबर : वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या महाराष्ट्र विरूद्ध दिल्ली रणजी सामन्यात महाराष्ट्र संघाचा कर्णधार स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे या जोडीने तब्बल 594 धावांची भागीदारी रचून रणजी क्रिकेटमधला 70 वर्षं जुना विक्रम मोडला. कर्णधार स्वप्नील गुगळेने त्रिशतक झळकावून आपल्या संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. स्वप्नीलने 521 चेंडूचा सामना करत नाबाद 351 धावा केल्यात. तर अंकितने 258 धावा करून त्याला मोलाची साथ दिली. शेवटी महाराष्ट्र संघाने 2 बाद 635 वर डाव घोषित केला.

स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे जोडीने तिसरया विकेटसाठी ही विक्रमी भागीदारी रचली. आजपर्यंतच्या रणजी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी विजय हजारे आणि गुल महंम्मद या जोडीने 1947 साली 577 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. जी आजवर अबाधित होती. या विक्रमानंतर सर्वच स्थरातून स्वप्नील  आणि अंकित बावणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2016 08:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close