S M L

कोल्हापुरात भगवं वादळ, मराठा समाजाचा विराट मोर्चा

Sachin Salve | Updated On: Oct 15, 2016 07:29 PM IST

कोल्हापुरात भगवं वादळ, मराठा समाजाचा विराट मोर्चा

15 ऑक्टोबर : छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरनगरीत आज एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यास मिळाला. 'यावचं लागतंय' अशा कोल्हापुरी स्टाईलमध्ये मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज अपेक्षेप्रमाणे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मोर्च्यात सहभागी झालाय. शहराला भगवमय स्वरुपप्राप्त झालंय.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्च्याच आयोजन करण्यात आलंय. सकाळी 10 च्या सुमारास ताराराणी चौक, गांधी मैदानसह 6 ठिकाणांहून हा मोर्चा निघाला. गेल्या महिन्याभरापासून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरातल्या मोर्चांच्या गर्दीचा उच्चांक मोडला. या मोर्च्याची ऐतिहासिक दसरा चौकामध्ये या मोर्चाची सांगता झाली. विशेष म्हणजे आजच्या मोर्चामध्ये कोल्हापूरसह बेळगाव सीमाभागातले मराठा बांधवही सहभागी झाले होते. त्याचबरोबर सांगली, सातारा आणि कोकणातील मराठा बांधवही या मोर्च्यात सहभागी झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसलेही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2016 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close