S M L

हॅप्पी बर्थ डे सचिन!

24 एप्रिलमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बॅटिंगचे सगळे रेकॉर्ड सचिनने आपल्या नावावर केले आहेत. नजिकच्या काळात इतर कोणी बॅट्समन त्याच्या जवळ पोहोचण्याची शक्यता नाही. 37 व्या वाढदिवसानिमित्त भविष्यात सचिन तेंडुलकरची बॅट अशीच तळपत राहो, याच 'आयबीएन-लोकमत'च्या सचिनला शुभेच्छा. सचिन आता एका शिखरावर उभा आहे. आणि त्याची स्पर्धा आता आहे ती स्वत:शीच. फार कमी वेळा तो स्वत:साठी निर्धारित केलेले लक्ष्य मीडियासमोर उघड करतो. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स आणि सेंच्युरीचा रेकॉर्ड सचिनच्याच नावावर आहे. पण अजूनही काही माईलस्टोन त्याला खुणावत आहेत. चार वेळा त्याने डबल सेंच्युरी केली. पण सचिन अद्याप ट्रिपल सेंच्युरीला गवसणी नाही घालू शकलेला.वेस्ट इंडिजचा ग्रेट बॅट्समन ब्रायन लाराने ट्रिपल सेंच्युरीची मजल दोनवेळा मारली. आणि एकदा तर त्याने चारशे रन्सचा रेकॉर्ड केला. भारतीय टीममध्येही विरेंद्र सेहवागने दोन ट्रिपल सेंच्युरी ठोकल्यात. डॉन ब्रॅडमन यांनी सचिन त्यांच्या सारखाच खेळतो, अशी पावती सचिनला दिली. खुद्द ब्रॅडमन यांच्याही नावावर एक ट्रिपल सेंच्युरी आहे. सचिन तेंडुलकर या खेळाडूंच्या यादीत विराजमान होईल का? सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 93 सेंच्युरी केल्यात. म्हणजे सेंच्युरीची सेंच्युरी करायला सचिनला हव्यात आणखी फक्त 7 सेंच्युरी. आणि तसे झाले तर क्रिकेटच्या इतिहासातला तो पहिला बॅट्समन असेल.टेस्ट आणि वन डे क्रिकेट सचिन आपल्या बॅटिंगने गेली दोन दशके गाजवत आहे. टी-20 च्या नॅशनल टीममध्ये सचिन नाही. पण आयपीएलच्या तिसर्‍या हंगामात सचिनने मुंबई इंडियन्सला फायनलमध्ये पोहोचवले आहे. आणि फायनलमध्ये विजय मिळवत क्रिकेटप्रेमींना वाढदिवसाची विजयी भेट देण्यासाठी तो उत्सुक आहे.सचिनचे एक स्वप्न त्याने आतापर्यंत उघडपणे मीडियाला सांगितले आहे. भारतीय टीमला वर्ल्डकप जिंकताना त्याला बघायचे आहे.आणि वर्ल्डकप जिंकून द्यायचा आहे. 2003मध्ये भारतीय टीमला फायनलमध्ये हार पत्करावी लागली. 2007 मध्ये पहिल्या राऊंडमध्येच टीम गारद झाली. सहावा वर्ल्डकप आता जवळ आला आहे. आणि यावेळी वर्ल्डकप आहे, भारतीय उपखंडात. त्यातही फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. दोन एप्रिल 2011ला होणार्‍या या वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय टीम खेळेल आणि या मॅचमध्ये सचिनची बॅट तळपावी याच 'आयबीएन-लोकमत'तर्फे सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा...

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 09:45 AM IST

हॅप्पी बर्थ डे सचिन!

24 एप्रिल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बॅटिंगचे सगळे रेकॉर्ड सचिनने आपल्या नावावर केले आहेत.

नजिकच्या काळात इतर कोणी बॅट्समन त्याच्या जवळ पोहोचण्याची शक्यता नाही. 37 व्या वाढदिवसानिमित्त भविष्यात सचिन तेंडुलकरची बॅट अशीच तळपत राहो, याच 'आयबीएन-लोकमत'च्या सचिनला शुभेच्छा.

सचिन आता एका शिखरावर उभा आहे. आणि त्याची स्पर्धा आता आहे ती स्वत:शीच. फार कमी वेळा तो स्वत:साठी निर्धारित केलेले लक्ष्य मीडियासमोर उघड करतो.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स आणि सेंच्युरीचा रेकॉर्ड सचिनच्याच नावावर आहे. पण अजूनही काही माईलस्टोन त्याला खुणावत आहेत. चार वेळा त्याने डबल सेंच्युरी केली. पण सचिन अद्याप ट्रिपल सेंच्युरीला गवसणी नाही घालू शकलेला.

वेस्ट इंडिजचा ग्रेट बॅट्समन ब्रायन लाराने ट्रिपल सेंच्युरीची मजल दोनवेळा मारली. आणि एकदा तर त्याने चारशे रन्सचा रेकॉर्ड केला. भारतीय टीममध्येही विरेंद्र सेहवागने दोन ट्रिपल सेंच्युरी ठोकल्यात. डॉन ब्रॅडमन यांनी सचिन त्यांच्या सारखाच खेळतो, अशी पावती सचिनला दिली. खुद्द ब्रॅडमन यांच्याही नावावर एक ट्रिपल सेंच्युरी आहे. सचिन तेंडुलकर या खेळाडूंच्या यादीत विराजमान होईल का?

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 93 सेंच्युरी केल्यात. म्हणजे सेंच्युरीची सेंच्युरी करायला सचिनला हव्यात आणखी फक्त 7 सेंच्युरी. आणि तसे झाले तर क्रिकेटच्या इतिहासातला तो पहिला बॅट्समन असेल.

टेस्ट आणि वन डे क्रिकेट सचिन आपल्या बॅटिंगने गेली दोन दशके गाजवत आहे. टी-20 च्या नॅशनल टीममध्ये सचिन नाही. पण आयपीएलच्या तिसर्‍या हंगामात सचिनने मुंबई इंडियन्सला फायनलमध्ये पोहोचवले आहे. आणि फायनलमध्ये विजय मिळवत क्रिकेटप्रेमींना वाढदिवसाची विजयी भेट देण्यासाठी तो उत्सुक आहे.

सचिनचे एक स्वप्न त्याने आतापर्यंत उघडपणे मीडियाला सांगितले आहे. भारतीय टीमला वर्ल्डकप जिंकताना त्याला बघायचे आहे.आणि वर्ल्डकप जिंकून द्यायचा आहे. 2003मध्ये भारतीय टीमला फायनलमध्ये हार पत्करावी लागली. 2007 मध्ये पहिल्या राऊंडमध्येच टीम गारद झाली.

सहावा वर्ल्डकप आता जवळ आला आहे. आणि यावेळी वर्ल्डकप आहे, भारतीय उपखंडात. त्यातही फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.

दोन एप्रिल 2011ला होणार्‍या या वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय टीम खेळेल आणि या मॅचमध्ये सचिनची बॅट तळपावी याच 'आयबीएन-लोकमत'तर्फे सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close