S M L

चेहरा प्रत्यारोपण यशस्वी

24 एप्रिलस्पेनमध्ये डॉक्टरांच्या एका टीमने इतिहास घडवला आहे. जगातली पहिली चेहर्‍याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. यात एका माणसाच्या संपूर्ण चेहर्‍याचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. स्पेनमधील 30 डॉक्टरांच्या या टीमने एका तरुण माणसाला संपूर्ण नवा चेहरा दिला आहे. यात जबडा, नाक, गाल, दात आणि स्नायूंचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. प्लास्टिक सर्जरी आणि मायक्रो न्यूरोव्हसक्युलर सर्जरीतील तंत्राचा वापर करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या संपूर्ण चेहरा रोपण शस्त्रक्रियेला 24 तास लागले. ज्या पेशंटवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचा 5 वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याचा चेहरा खूपच विद्रूप झाला होता. त्यानंतर त्याच्यावर नऊ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आणि त्यानंतर ही संपूर्ण चेहर्‍याच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या हा तरुण बोलू , खाऊ किंवा हसू शकत नाही. पण तो डोळ्यांनी बघू शकतो आणि स्वत:ची लाळ गिळू शकतो. या पेशंटचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 10:28 AM IST

चेहरा प्रत्यारोपण यशस्वी

24 एप्रिल

स्पेनमध्ये डॉक्टरांच्या एका टीमने इतिहास घडवला आहे. जगातली पहिली चेहर्‍याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. यात एका माणसाच्या संपूर्ण चेहर्‍याचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

स्पेनमधील 30 डॉक्टरांच्या या टीमने एका तरुण माणसाला संपूर्ण नवा चेहरा दिला आहे. यात जबडा, नाक, गाल, दात आणि स्नायूंचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

प्लास्टिक सर्जरी आणि मायक्रो न्यूरोव्हसक्युलर सर्जरीतील तंत्राचा वापर करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या संपूर्ण चेहरा रोपण शस्त्रक्रियेला 24 तास लागले.

ज्या पेशंटवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्याचा 5 वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याचा चेहरा खूपच विद्रूप झाला होता. त्यानंतर त्याच्यावर नऊ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आणि त्यानंतर ही संपूर्ण चेहर्‍याच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

सध्या हा तरुण बोलू , खाऊ किंवा हसू शकत नाही. पण तो डोळ्यांनी बघू शकतो आणि स्वत:ची लाळ गिळू शकतो. या पेशंटचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close