S M L

आघाडीचं आणि हे सरकार एकसारखंच -आदित्य ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 15, 2016 07:43 PM IST

आघाडीचं आणि हे सरकार एकसारखंच -आदित्य ठाकरे

15 ऑक्टोबर : 2014 मध्ये सत्ताबद्दल झाला आणि आपलं सरकार आलं असं वाटलं होतं पण कोणतेही बदल झाले नाही. त्यामुळे आज मोर्चे काढण्याची वेळी आलीये. अगोदरचं नालायक सरकार आणि या सरकारमध्ये कोणताही फरक वाटत नाही अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली. तसंच शिक्षणमंत्री देता की जाता असा नाराच आदित्य ठाकरेंनी लावला.

शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराविरूद्ध आज युवासेनेने महामोर्चा काढला. युवासनेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर इस्लाम जिमखान्यावर झालेल्या सभेत आदित्य यांनी शिक्षण विभागात केजी ते पीजीपर्यंत सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. केजीच्या ऍडमिशनसाठी उकळलं जाणारं भरमसाठ डोनेशन, शालेय मुलांना होणारा दप्तराच्या वाढत्या वजनाचा त्रास, महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहांमधली अस्वच्छता, 11 वीच्या ऑनलाईन ऍडमिशनमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास अशा अनेक विषयांना त्यांनी आपल्या भाषणातून हात घातला. शिक्षण विभागात कधी बदल होणार ? असं म्हणत त्यांनी थेट शिक्षणमंत्र्यांवरही टीकेचे आसूड ओढले.

भेटून काही उपयोग नाही म्हणून मोर्चा काढला. शिक्षण मंत्र्यांना भेटलो होतो तेव्हा आश्वासन मिळाले होते की, प्रश्न सोडवतो पण गेल्या दीड वर्षांतला प्रवास हा सुशासन नसून आश्वासन असल्याचे वाटतं आहे. जणून मागण्यांना एटीकेटी लागते की काय असं वाटतंय असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

तसंच या वर्षी ऑनलाईन ऍडमिशनमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नाही असा आरोप करत ऑन लाईन ऍडमिशनचं घोड आणलं कुणी आणलं ? आता 2 वर्ष झाली आता लोकं आम्हाला विचारतायत की शिक्षणाचे 'अच्छे दिन' कधी येणार ? असा सवालही त्यांनी उपस्थिती केला. माझा कुणा एका व्यक्तीवर रोख नाही असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2016 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close