S M L

'ग्रेट बॅरिअर रीफ' मृत झालेली नाही !

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2016 06:13 PM IST

'ग्रेट बॅरिअर रीफ' मृत झालेली नाही !

17 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियामधली जगप्रसिद्ध ग्रेट बॅरिअर रीफ मृत पावलीय, अशा बातम्या सोशल मीडियावर आल्या आणि सगळीकडे खळबळ माजली पण जैवविविधतेने नटलेली ही प्रवाळ बेटं पूर्णपणे मृत झालेली नाहीत, असं संशोधकांनी म्हटलंय.

' ग्रेट बॅरिअर रीफचं 2016 मध्ये दीर्घ आजाराने निधन झालं. ही रीफ अडीच कोटी वर्षांपूर्वीची आहे' अशी बातमी एका मासिकाने छापून टाकली आणि या प्रवाळ बेटांचा मृत्यूलेखच लिहिला. पण अशा सनसनाटी बातम्यांवर विश्‍वास ठेवू नये, ग्रेट बॅरिअर रीफ धोक्यात येणं आणि मृत होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,असं स्पष्टीकरण कोरल रीफ इकोसिस्टीम प्रोग्रॅमचे प्रमुख रसेल ब्रेनार्ड यांना द्यावं लागलंय.

ग्रेट बॅरिअर रीफ मृत झाल्याची बातमी देणारे लेखक रोवन जॅकबसेन हे पर्यावरणाच्या विषयावर लेख लिहितात ते संशोधक नाहीत. तरीही ग्रेट बॅरियर रीफ मृत झाल्याची बातमी त्यांनी संशोधकांचा दाखला देत देऊन टाकली आणि एकच हाहा:कार माजला.

काय आहे ग्रेट बॅरिअर रीफ ?

Great Barrier Reef4ग्रेट बॅरियर रीफ हे जगातलं सर्वात मोठं प्रवाळ बेट आहे. 2900 प्रवाळांच्या भिंती आणि 900 बेटांची ही वैविध्यपूर्ण अशी पर्यावरण व्यवस्था आहे. आणि याचा विस्तार आहे.. 3 लाख 44 हजार 400 चौ.किमीचा. वेगवेगळ्या प्रकारची प्रवाळं, त्यावर लहरणा•या सागरी वनस्पती, रंगीबेरंगी मासे, सागरी कासवं या सगळ्याचं एक अद्भत जग म्हणजे ग्रेट बॅरिअर रीफ.

सागरी जीवनावर संशोधन करणारे संशोधक एकदा तरी या ग्रेट बॅरिअर रीफला भेट देतात. हवामान बदल, वाढतं तापमान, प्रदूषण या सगळ्याचा परिणाम या प्रवाळ बेटांवर होतोय. इथली प्रवाळं नष्ट होत चाललीयत आणि ग्रेट बॅरिअर रीफचा रंगही विटलाय. पण पूर्ण ग्रेट बॅरिअर रीफ नष्ट झालेली नाही तर तिचा 35 टक्के •हास झालाय, असं सागरी संशोधकांनी म्हटलंय. या प्रवाळ बेटांच्या संवर्धनासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close