S M L

हे चुकीचं, एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

Sachin Salve | Updated On: Oct 18, 2016 12:06 AM IST

khadse_file_cm17 ऑक्टोबर : गुन्हेगारांना पक्षाच प्रवेश दिला जातो हे चुकीचं आहे. गोपीनाथ मुंडे आणि आमच्या काळात आम्ही माणसांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच पक्ष प्रवेश द्यायचो असा टोला माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

पुण्यातला कुख्यात गुंड बाबा बोडके आणि गुंडांना प्रवेशावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडिमार होतोय. आधी पुण्यातला गुंड बाबा बोडके याच्याबरोबरच्या फोटोमुळे ते वादात सापडले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. बाबा बोडके मुख्यमंत्र्यांना भेटलाच कसा, असा सवाल त्यांनी केला. अडवाणी आणि वाजपेयांची परंपरा आजा भाजपमध्ये राहिली नाही, अशी टीका अजित पवारांनी केली. दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आयबीएन लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात भाजपच्या गुन्हेगारीकरणावरून थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलंंय.

अशा माणसांची नीट चौकशी न करता पक्षात प्रवेश दिला असेल तर ते चुकीचं आहे. भाजपने आतापर्यंत अशा गुंडांना पक्षात थारा दिली नाही. एक वेळ अशी होती गोपीनाथ मुंडे आणि मी असताना अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला नाही अशी आठवणही खडसेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

तसंच राजकारणातील गुन्हेगाराविरोधात गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा काढली होती. एखाद्यावेळेस कुणी येतं आणि कार्यकर्त्यांना घेऊन येत आणि न चौकशी करता प्रवेश दिला जातो हे टाळलं पाहिजे असा सल्लाही खडसेंनी मुख्यमंत्र्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2016 08:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close