S M L

पुण्यात विद्यार्थ्यांचा सत्याग्रह

26 एप्रिलपुण्याच्या गेनबा सोपानराव मोझे शाळेच्या मुलांनी आज अनोख्या पद्धतीनं आंदोलन केले. शिक्षणासंदर्भातील त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी आज सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला.साधू वासवानी चौकापासून निघून कलेक्टर ऑफिसपर्यंत त्यांनी मोर्चा काढला. यानंतर त्यांनी कलेक्टर दळवी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी विद्यार्थांनी महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पेहराव केले होते. सगळ्या मुलांना समान शिक्षण, आहार आणि पाठ्यपुस्तके मिळावीत, अशा मागण्या यावेळी विद्यार्थ्यांनी केल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 01:24 PM IST

पुण्यात विद्यार्थ्यांचा सत्याग्रह

26 एप्रिल

पुण्याच्या गेनबा सोपानराव मोझे शाळेच्या मुलांनी आज अनोख्या पद्धतीनं आंदोलन केले. शिक्षणासंदर्भातील त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी आज सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला.

साधू वासवानी चौकापासून निघून कलेक्टर ऑफिसपर्यंत त्यांनी मोर्चा काढला. यानंतर त्यांनी कलेक्टर दळवी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

यावेळी विद्यार्थांनी महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पेहराव केले होते.

सगळ्या मुलांना समान शिक्षण, आहार आणि पाठ्यपुस्तके मिळावीत, अशा मागण्या यावेळी विद्यार्थ्यांनी केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close